आता अमेरिकेतील 96 गुरुद्वारांमध्येही भारतीय अधिकाऱ्यांना 'नो एंट्री'

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कॅनडातील 14 गुरुद्वारांमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता अमेरिकेत भारतीय अधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : 'शिख समन्वय पूर्व तट समिती' आणि 'अमेरिकन गुरुद्वार प्रबंधक समिती'ने अमेरिकेतील 96 गुरुद्वारांमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना प्रवेशासंदर्भात बंदी आणली आहे. ही बंदी कीर्तन किंवा धार्मिक यात्रांवरही लागू करण्यात आली आहे. 

अमेरिकेपूर्वी कॅनडातील 14 गुरुद्वारांमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता अमेरिकेत भारतीय अधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. कॅनडात बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या गुरुद्वारांमध्ये प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली होती. 

याबाबतची बंदी 'शिख समन्वय पूर्व तट समिती'(एससीसीईसी) आणि 'अमेरिकन गुरुद्वार प्रबंधक समिती' (एपीजीसी) कडून अमेरिकेतील 96 गुरुद्वारांमध्ये घालण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international news 96 gurdwaras in US ban entry of Indian officials