'त्या' निर्णयाला चीन, भारत जबाबदार : ट्रम्प 

यूएनआय
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

"आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, कारण हा करार अमेरिकेसाठी घातक होता. या कराराचा सर्वाधिक फायदा भारत आणि चीन या देशांना असून, या करारामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले असते. देशातील नोकऱ्या व उद्योग त्यामुळे प्रभावित झाले असते.'' 

- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका

वॉशिंग्टन : गेल्या वर्षी पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, त्यासाठी भारत आणि चीन हे देश जबाबदार असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. हा करार अपारदर्शी असून, ज्या देशांना या कराराचा सर्वाधिक फायदा होणार आहे, अशा देशांसाठी अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागली असती, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. 

पक्षाच्या कृती समितीला संबोधित करताना ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले, "आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, कारण हा करार अमेरिकेसाठी घातक होता. या कराराचा सर्वाधिक फायदा भारत आणि चीन या देशांना असून, या करारामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले असते. देशातील नोकऱ्या व उद्योग त्यामुळे प्रभावित झाले असते.'' 

ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या करारामुळे अमेरिकेला ट्रिलियन डॉलरचा फटका बसेल तसेच, यामुळे तेल, वायू, कोळसा व इतर उद्योग प्रभावीत होतील, असे ट्रम्प यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. 

दरम्यान, या करारावर नव्याने चर्चा करण्यास आपण तयार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News China India Responsible US President Donald Trump