बालिकेवर बलात्कारप्रकरणी 3 भारतीयांना सिंगापूरमध्ये अटक

International News Crime News Minor Rape 3 Indians Arrested in Singapur
International News Crime News Minor Rape 3 Indians Arrested in Singapur

सिंगापूर : बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, मूळचे भारतीय असलेल्या तिघांना बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी सिंगापूरमध्ये अटक करण्यात आली. या तिघांनी 2016 साली 13 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. त्यानंतर आज त्यांना अटक करून शिक्षा ठोठावण्यात आली.

याप्रकरणी गिल गुरजंत सिंग (25) आणि सुरजित सिंग (29) या दोघांना न्यायालयाने 15 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली तर जुगराज सिंग (33) याला 8 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे वृत्त 'द स्ट्रेटस् टाइम्स'ने दिले होते. याबाबतचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणात दोषींना 20 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्याची तरतूद येथील कायद्यामध्ये आहे. 

दरम्यान, जुगराज सिंग, गिल गुरजंत सिंग आणि सुरजित सिंग या शिक्षा सुनावण्यात आलेल्या तीनही दोषी भारतीय बांधकाम कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com