माझे ट्रम्प यांच्याशी संबंध होते : माजी प्लेबॉय मॉडेल

वृत्तसंस्था
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

माजी प्लेबॉय मॉडेल असलेल्या मॅकडोगलने ट्रम्प यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. तत्काळ त्यांनी मला आवडत असल्याचे सांगितले. तरीदेखील बोलणी थांबवली. मला त्यांनी मी किती सुंदर दिसते याबाबत सांगितले होते. 

इराण : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवर आल्यापासून त्यांच्याबाबत तरुणी-महिलांकडून आरोप केले जात आहेत. त्यानंतर आता एका माजी प्लेबॉय मॉडेलने 2006 साली ट्रम्प यांच्यासोबत आपले संबंध असल्याची कबुली दिली. तिच्या या वक्तव्यावरून डोनाल्ड ट्रम्प आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

former playboy model McDougal

मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील पॉर्नस्टार असलेली स्टॉर्मी डॅनियलनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी वकिलाने सुमारे 82 लाख रूपये दिल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती. ट्रम्प आणि त्या पॉर्नस्टारबाबत चर्चा सुरु होत्या. या सर्व घडामोडीनंतर अखेर या पॉर्नस्टारने हा दावा खोडून काढत ट्रम्प यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. 

former playboy model McDougal

मात्र, आता माजी प्लेबॉय मॉडेल असलेल्या मॅकडोगलने ट्रम्प यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. तत्काळ त्यांनी मला आवडत असल्याचे सांगितले. तरीदेखील बोलणी थांबवली. मला त्यांनी मी किती सुंदर दिसते याबाबत सांगितले होते. 

दरम्यान, व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी याबाबत आरोप फेटाळून लावले. ''ही खूप जुनी बातमी असून, ही खोटी बातमी आहे. यात काहीही तथ्य नाही. तसेच राष्ट्राध्यक्षांनीही हे सर्व आरोप फेटाळत माझे मॅकडोगल या मॉडेलची संबंध नसल्याचे सांगितले''.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Donald Trump Playboy Model Relation