ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायचे नव्हते : अमेरिकेचे पत्रकार

पीटीआय
गुरुवार, 4 जानेवारी 2018

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याचे त्यांची पत्नी मेलानिया यांना समजले, तेव्हा त्यांना आनंद वाटला नाही, तर त्यांना अश्रू कोसळले, याबाबतची माहिती एका पत्रकाराने दिल्यानंतर हे समोर आले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायचे नव्हते, असे अमेरिकेतील पत्रकार मायकल व्होल्फ यांनी त्यांच्या 'फायर अँड फ्युरी : इनसाइड द ट्रम्प व्हाइट हाऊस' या पुस्तकात सांगितले. तसेच जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या पत्नी मेलानिया यांना आनंद वाटला नाही, असेही त्या पुस्तकात लिहिले आहे.  
 
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात लढत झाली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.

त्यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला होता. मात्र, व्होल्फ यांनी याबाबतचे वर्णन त्यांच्या पुस्तकात केले आहे. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याचे त्यांची पत्नी मेलानिया यांना समजले, तेव्हा त्यांना आनंद वाटला नाही, तर त्यांना अश्रू कोसळले, याबाबतची माहिती एका पत्रकाराने दिल्यानंतर हे समोर आले आहे.

तसेच ट्रम्प यांचा उद्देश जिंकणे हा कधीच नव्हता. त्यांचे लक्ष जिंकणे हे कधीही नव्हते. मात्र, मी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होऊ शकतो, असे ते त्यांचे सहकारी सॅम नूनबर्ग यांना नेहमी सांगत असत, असेही या पुस्तकात सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international news donald trump US president