काबूलमध्ये आत्मघाती हल्ला ; 40 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिया सांस्कृतिक आणि धार्मिक संघटनमध्ये एक मोठा आत्मघाती स्फोट घडवण्यात आला. अफगाणिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. 

तसेच येथील गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या स्फोटानंतर परिसरात आणखी दोन स्फोट झाले. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच काही महिन्यांपूर्वी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने संपूर्ण अफगाणिस्तानात शिया ठिकाणांवर हल्ले केले होते. या स्फोटानंतर घटनास्थळावर असंख्य मृतदेह आढळून आले.  याशिवाय आज झालेल्या आत्मघाती हल्ल्यादम्यान असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. 

दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात शिया अल्पसंख्यांकांच्या मशिदीवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हा स्फोट घडवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international news Kabul Blast 40 died suicide bomber