'मालदीव'प्रश्नी मोदी, ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मालदीवमधील राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले. यासाठी सरकारकडून मालदीवमध्ये 15 दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली. या आणीबाणीमुळे कोणालाही अटक आणि छापा मारण्याचे अधिकार प्राप्त झाले.

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांमध्ये मालदीव प्रश्नावर फोनवर चर्चा करण्यात आली. मालदीवसह अफगाणिस्तान आणि इडो-पॅसिफिकबाबत सुरक्षा सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे.

modi-trump

मालदीवमधील राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले. यासाठी सरकारकडून मालदीवमध्ये 15 दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली. या आणीबाणीमुळे कोणालाही अटक आणि छापा मारण्याचे अधिकार प्राप्त झाले. याशिवाय संपत्ती जप्त करण्याचेही अधिकार मिळाले. त्यामुळे येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनत आहे. तसेच मालदीवमधील सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भारताने मध्यस्थी करावी, अशी मागणी खुद्द माजी अध्यक्ष महंमद नाशिद यांनी केली केली होती. अखेर या मागणीनुसार पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. 
  
दरम्यान, मालदीवमधील आणीबाणीच्या परिस्थितीत भारताने हस्तक्षेप करू नये आणि हा प्रश्‍न चर्चेनेच सुटावा, अशी भूमिका चीनने घेतली होती. 

 

Web Title: Marathi News International News Modi Trump discussion on call