दारू पार्टीसाठी लढवली अनोखी शक्कल !

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नववर्षाच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडमध्ये दारूबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी असल्याने चक्क तरुणांच्या एका ग्रुपने रविवारी दुपारी कमी भरती होणारी कोरोमंडल येथे एका रेतीच्या रेस्टॉरंटची उभारणी केली होती. त्यानंतर त्यांनी एक छोटा टेबल आणि एक दारूने भरलेला बर्फाचा डबा ठेवला आणि त्यांनी तेथे पार्टी केली. 

वेलिंगटन : मद्यपींना दारूची गरज भासल्यास ते निरनिराळ्या कल्पना करत पार्टीचा बेत आखतात आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. असाच एकप्रकारे न्यूझीलंडमध्ये झाला आहे. न्यूझीलंडमध्ये 31 डिसेंबरला दारूबंदी असल्याने मद्यपींनी एक अनोखा मार्ग निवडला आहे, त्यांनी चक्क समुद्रात एक रेतीचे द्वीप तयार करुन तिथे दारूची पार्टी केली.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडमध्ये दारूबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी असल्याने चक्क तरुणांच्या एका ग्रुपने रविवारी दुपारी कमी भरती होणारी कोरोमंडल येथे एका रेतीच्या रेस्टॉरंटची उभारणी केली होती. त्यानंतर त्यांनी एक छोटा टेबल आणि एक दारूने भरलेला बर्फाचा डबा ठेवला आणि त्यांनी तेथे पार्टी केली. 

स्थानिक लोकांनी येथील पाण्याला 'आंतरराष्ट्रीय पाणी' म्हणून संबोधित केले. न्यूझीलंडच्या कोरोमंडल येथे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपींना लगाम लावण्यासाठी प्रत्येकी 250 डॉलर किंवा अटकेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापासून वाचण्यासाठी त्या ग्रुपने ही अनोखी शक्कल लढवली. त्यांनी याबाबतचे फेसबुक ग्रुप आणि इतर सोशल मीडियावर फोटोही पाठवले. 

''हा रचनात्मक विचार आहे'', असे स्थानिक पोलिस कमांडर निरीक्षक जॉन केली यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international news New Zealanders build island in bid to avoid alcohol ban