नायजेरियात आत्मघाती हल्ल्यात 19 ठार 

पीटीआय
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

उत्तरपूर्व नायजेरियातील मच्छिबाजारात झालेल्या तीन आत्मघाती हल्ल्यात 19 जण ठार झाले, असे दहशतवादी संघटनेच्या नेत्याने आज सांगितले. बोको हराम या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

कानो (नायजेरिया)  : उत्तरपूर्व नायजेरियातील मच्छिबाजारात झालेल्या तीन आत्मघाती हल्ल्यात 19 जण ठार झाले, असे दहशतवादी संघटनेच्या नेत्याने आज सांगितले. बोको हराम या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

काल रात्री कोनडूंगा येथे स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता हल्ला झाला. बोरनो राज्याची राजधानी मैनदुगुरीपासून 35 किमीवर हा हल्ला झाला. नायजेरियाच्या सैन्याला मदत करणारे सिव्हिलियन संयुक्त टास्क पथकाचे बाबाकुरा आणि मुसा यांनी सांगितले की, हा आत्मघाती हल्ला करणारे सर्व जण पुरुष होते. या हल्ल्यात 19 जण मरण पावले; तर 70 जण जखमी झाले. या हल्ल्यातील दोन हल्ले हे तशन कीफी मच्छिबाजारात झाले. या हल्ल्यानंतर चौथ्याच मिनिटाला जवळच तिसरा आत्मघाती हल्ला झाला, असे कोलो यांनी सांगितले. मरण पावलेल्यांमध्ये 18 नागरिक, तर एक सैनिक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Nigeria Suicide Bomber 19 death