इराणमधील विमान अपघातात 66 प्रवाशांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

इराणच्या एका प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ६६ प्रवाशांचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त एक वृत्तसंस्थेने दिले आहे. इराणच्या दक्षिण भागात या विमानाचा अपघात झाला असून, हे विमान तेहरानहून यासूज येथे जात असल्याची माहिती मिळत आहे.   

नवी दिल्ली : इराणच्या एका प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ६६ प्रवाशांचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त एक वृत्तसंस्थेने दिले आहे. इराणच्या दक्षिण भागात या विमानाचा अपघात झाला असून, हे विमान तेहरानहून यासूज येथे जात असल्याची माहिती मिळत आहे.   

66 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान आज (रविवार) इराणच्या झाग्रोस पर्वतावर कोसळले होते. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात होते. येथील प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, आता यातील सर्व 66 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

इराणमध्ये कोसळलेले हे विमान 'इराणीयन' विमान कंपनीचे आहे की अन्य कोणत्या कंपनीच्या मालकीचे याचा तपास केला जात आहे. मागील महिन्यात 11 फेब्रुवारी रोजी रशियाचे विमानाने 71 प्रवाशांना घेऊन जात असताना उड्डाण केले होते. मात्र, यादरम्यान विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Plane Crash Iran 66 dead