शी जिनपिंग राहणार चीनच्या आजीवन अध्यक्षपदी

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच 'सीपीसी' पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

नवी दिल्ली : चीनने आज (रविवार) ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा आज (रविवार) हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Xi Jinping

चीनच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोन पदांसाठी बंधनकारक असलेली मर्यादा दोन तृतीयांश बहुमताने संपवली आहे. सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना' (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते. चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच 'सीपीसी' पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

दरम्यान, शी जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू असून, हा कार्यकाळ २०२३ मध्ये संपणार आहे. आज झालेल्या बदलानंतर शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Political News Xi Jinping Is President For Life in China