श्रीलंकेत आणीबाणी लागू ; बौद्ध-मुस्लिमांच्या दंगलीमुळे निर्णय

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

बौद्ध आणि मुस्लिम समाजामधील तणाव गेल्या वर्षापासून कायम आहे. येथील काही मुस्लिम लोक बौद्ध समाजातील लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारावा, यासाठी दबाव आणत आहेत. बौद्ध पुरातत्वानुसार महत्वाचे समजल्या जाणाऱ्या स्थळांना उद्धवस्त करत आहेत.

कोलंबो : देशातील बौद्ध आणि मुस्लिम समाजामध्ये झालेल्या तणावाचे रुपांतर दंगलीमध्ये झाले असून, या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत 10 दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी मंगळवारी दिली. 

बौद्ध आणि मुस्लिम समाजामधील तणाव गेल्या वर्षापासून कायम आहे. येथील काही मुस्लिम लोक बौद्ध समाजातील लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारावा, यासाठी दबाव आणत आहेत. बौद्ध पुरातत्वानुसार महत्वाचे समजल्या जाणाऱ्या स्थळांना उद्धवस्त करत आहेत. तसेच बौद्ध समाजातील व्यक्ती श्रीलंकेतील रोहिंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवाद उफळून आला आहे. 

srilanka emergency

त्यापार्श्वभूमीवर आज कॅबिनेटची विशेष बैठक झाली. या बैठकीमध्ये देशात 10 दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच देशातील इतर भागांमध्ये पसरणाऱ्या सांप्रदायिक दंगली टाळण्यासाठी हा निर्णय कॅबिनेटकडून घेण्यात आला, अशी माहिती प्रवक्ते दयासिरी जयासेकरा यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. 

तसेच सरकारने या भागात सैन्यही पाठवले. याशिवाय फेसबुकच्या माध्यमातून हिंसा भडकाविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणारा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Sri lanka Emergency Declare for 10 days