ट्रम्प यांच्या वकीलाने पॉर्न स्टारला 'त्यावेळी' का दिले पैसे

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी वकिलाने एका पॉर्न स्टारला सुमारे 82 लाख रूपये दिल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी वकिलाने एका पॉर्न स्टारला सुमारे 82 लाख रूपये दिल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ही रक्कम दिल्याचे 'द वॉल स्ट्रिट जर्नल'ने सांगितले आहे. 

पॉर्न स्टार असलेल्या स्टेफनी क्लिफॉर्डने सांगितले, की ''ट्रम्प यांच्याशी 2016 च्या 'सिलेब्रिटी गोल्फ इव्हेंट'मध्ये भेट झाली. ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया यांच्याशी विवाह केल्यानंतर एका वर्षानंतर आमच्या दोघांत भेट झाल्याचे तिने म्हटले आहे. क्लिफोर्डने सांगितले, की एन्काऊंटर काही कालावधीनंतर झाले. मात्र,'व्हाइट हाऊस'ने याबाबतची शक्यता फेटाळून लावली.

ट्रम्प यांचे दीर्घकालीन वकील राहिलेले मायकल कोहेन यांनी संबंधित महिलेला ऑक्टोबर, 2016 रोजी याबाबतची माहिती कोठेही देऊ नये, यासाठी 82 लाख देऊ केले. ही रक्कम अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या एक महिन्याअगोदर देण्यात आल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. 

''हा अहवाल खूप जुना आहे. तो आता पुनर्लिखित केला गेला आहे. जे या पुस्तकात प्रकाशित झाले. ते निवडणुकीपूर्वीही नाकारण्यात आले होते'', असे स्पष्टीकरण व्हाइट हाऊसकडून देण्यात आले. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी या पुस्तकातून मांडण्यात आलेले खोटे असल्याचे म्हणत हे सर्व फेटाळून लावले आहे. मात्र, 'एक्सेस हॉलिवूड'ची होस्ट बिल्ली बुश आणि अन्य सात जणींनी ट्रम्प यांनी अश्लील टिप्पणी केल्याचे सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news international news Trumps lawyer arranged 130000 dollar payment to former porn star to stay quiet