डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे संबंध नव्हते ; पोर्नस्टारचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी वकिलाने सुमारे 82 लाख रूपये एका माजी पॉर्नस्टारला दिल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती. त्यानंतर ट्रम्प आणि त्या पॉर्नस्टारबाबत चर्चा सुरु होत्या. या सर्व घडामोडीनंतर स्टॉर्मी डॅनियल या पॉर्नस्टारने या दावा खोडून काढत ट्रम्प यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा केला.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एका पॉर्नस्टारसोबत संबंध असल्याची चर्चा होत आहे. मात्र, आता त्या पॉर्नस्टारने माझे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला आहे. याबाबत पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल या पॉर्नस्टारने हा दावा केला आहे. तिचे वकील डॅनियल यांनीदेखील या दाव्याचे समर्थन केले आहे. 

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी वकिलाने सुमारे 82 लाख रूपये एका माजी पॉर्नस्टारला दिल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती. त्यानंतर ट्रम्प आणि त्या पॉर्नस्टारबाबत चर्चा सुरु होत्या. या सर्व घडामोडीनंतर स्टॉर्मी डॅनियल या पॉर्नस्टारने या दावा खोडून काढत ट्रम्प यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा केला.

यापूर्वी सांगितले जात होते, की पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल आणि ट्रम्प याचे 2006 साली संबंध होते. 

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ही पॉर्नस्टारला दिली असल्याचे सांगितले जात होते. याबाबत 'द वॉल स्ट्रिट जर्नल'मध्ये सांगण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news International News US President Donald Trump Relation Porn Star