7 वर्षीय योगा शिक्षक कमावतो, तब्बल 12 लाख !

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सन कुआंग असे त्या तरूण योगा शिक्षकाचे नाव आहे. भारतातील प्राचीन प्रथा शिकवण्यासाठी सन कुआंग प्रयत्न करत आहे. योगाचे शिक्षण देऊन आत्तापर्यंत त्याने  सुमारे 12 लाखांची कमाई केली. त्यामुळे आता सन हा त्याच्या वयातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.

बीजिंग : चीनमधील सात वर्षीय मुलगा सर्वात तरुण योगा शिक्षक बनला आहे. हा 7 वर्षीय योगा शिक्षक पॉकेटमनी म्हणून सुमारे 12 लाख रूपये कमावतो. त्याच्याकडे योगाचे शिक्षणाचे अधिकृत प्रमाणपत्रही आहे. या योगा शिक्षकाने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे सर्वकाही साध्य केले आहे.

सन कुआंग असे त्या तरूण योगा शिक्षकाचे नाव आहे. भारतातील प्राचीन प्रथा शिकवण्यासाठी सन कुआंग प्रयत्न करत आहे. योगाचे शिक्षण देऊन आत्तापर्यंत त्याने  सुमारे 12 लाखांची कमाई केली. त्यामुळे आता सन हा त्याच्या वयातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.  

yoga

सनची स्टोरी सध्या येथील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील मीडियाने सन हा पूर्व चीनमधील असल्याचे सांगितले. सर्वात कमी वयाचा योगा शिक्षक म्हणून त्याने जगभरात नाव कमवले आहे.

याबाबत सनच्या आईने सांगितले, की  सन हा 2 वर्षांपासून योगा शिकत होता. त्यानंतर त्याने योगामध्ये नैपुण्य मिळवले. तसेच सन हा स्वत: आत्मकेंद्रीत झाल्याने हे साध्य करू शकला. 

Web Title: Marathi News International News Yoga Teacher 7 Years old earning 12 lakhs