कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी घेणार पाकमध्ये भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तान सरकारने परवानगी दिल्याची माहिती पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. त्यानुसार 25 डिसेंबर रोजी त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानमधील तुरूंगात जाधव यांची भेट घेणार आहेत.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. बलुचिस्तान आणि कराचीमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना भेटण्यासाठी जाधव यांच्या आईने पाकिस्तान सरकारकडे व्हिसासाठी अर्ज केला होता. तसेच याप्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील विशेष लक्ष घातले होते. त्यानंतर आई आणि पत्नीला भेटण्याबाबत पाकिस्तान सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना भेटण्याची परवानगी कधी मिळणार हे स्पष्ट झाले नव्हते.

अखेर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी पाकिस्तानमधील तुरूंगात त्यांची आई आणि पत्नी भेट घेणार आहेत, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांची दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international Pakistan allows Kulbhushan Jadhav’s wife, mother to meet him on December 25