पाकिस्तानकडून 145 भारतीय मच्छिमारांची सुटका

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात असताना पाकिस्तानाने 145 भारतीय मच्छिमारांची गुरूवारी सुटका केली. मात्र, आणखी 140 हून अधिक मच्छिमार अद्यापही कराचीमध्ये बंदिस्त आहेत.

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात असताना पाकिस्तानाने 145 भारतीय मच्छिमारांची गुरूवारी सुटका केली. मात्र, आणखी 140 हून अधिक मच्छिमार अद्यापही कराचीमध्ये बंदिस्त आहेत.

शेकडो भारतीय मच्छिमार गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या कराचीतील मलिर कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यापैकी 145 मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिली आहे. या सर्व मच्छिमारांना पाकिस्तानातील पाण्यात मासेमारी करताना ताब्यात घेतले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते पाकिस्तानातील कराची येथील कारागृहात बंदिस्त होते. त्यानंतर आज त्यांची पाकिस्तानच्या कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर इधी फाऊंडेशनचे प्रमुख फैसल इधी यांनी या सर्व मच्छिमारांना काही भेटवस्तू आणि काही रुपये देऊ केले. 

या सर्व मच्छिमारांची सुटका केल्यानंतर त्यांना कडक बंदोबस्तात कराची कॅन्टोमेंट रेल्वे स्थानकात नेण्यात आले. तेथून त्यांना लाहोर येथे रेल्वेने पाठवण्यात आले असून, वाघा बॉर्डरवर भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international Pakistan frees 145 Indian fishermen 140 more languish in jail