रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व द्या : संयुक्त राष्ट्रसंघ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

म्यानमारमधील धार्मिक द्वेषाचा भाग एक अमानुष दृश्य आहे. यामुळे 6 लाख 20 हजार मुस्लिमांना बांगलादेशात पलायन करावे लागले आहे. तसेच म्यानमारमधील 'किडे' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहिंग्यांविरूद्ध वाढवण्यात आलेली हिंसा हा चिंतेचा विषय आहे.  ( सौदी अरेबियाचे संयुक्त राष्ट्र संघाचे राजदूत अब्दुल्ला अल् मौलमी )

नवी दिल्ली : रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरु केलेली कारवाई थांबवावी आणि त्यांना म्यानमारचे पूर्ण नागरिकत्वाचा हक्क देण्यात यावा,  असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. रोहिंग्यांचा मुद्दा जगभरात गाजत असताना राष्ट्रसंघाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. 

म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात तेथील लष्कराकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे तेथील रोहिंग्या वेगवेगळ्या देशात स्थलांतर करत आहेत. तसेच रोहिंग्यांनी भारतातही आश्रय घेतल्याचे समोर आले. रोहिंग्यांच्या या समस्येची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने रोहिंग्याविरोधातील लष्करी कारवाई थांबवावी आणि तेथील नागरिकांना म्यानमारचे नागरिकत्व देऊन पूर्ण अधिकार देण्यात यावे, असे म्हटले आहे. 

सौदी अरेबियाचे संयुक्त राष्ट्र संघाचे राजदूत अब्दुल्ला अल् मौलमी 'ओआयसी'च्या वतीने बोलताना म्हणाले, म्यानमारमधील धार्मिक द्वेषाचा भाग एक अमानुष दृश्य आहे. यामुळे 6 लाख 20 हजार मुस्लिमांना बांगलादेशात पलायन करावे लागले आहे. तसेच म्यानमारमधील 'किडे' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहिंग्यांविरूद्ध वाढवण्यात आलेली हिंसा हा चिंतेचा विषय आहे. म्यानमारच्या सुरक्षा यंत्रणांनीही राखीन प्रांतातील 60 टक्के मुस्लिमांना त्यांच्या मुलांसह पलायन करण्यासाठी दबाव टाकला.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी निर्वासित रोहिंग्यांच्या मुद्यावरुन कालच मोदी सरकारवर टीका केली होती.

Web Title: marathi news international UN committee urges Myanmar to give citizenship to Rohingyas