अमेरिकेतील गोळीबार : साठीतल्या पॅडॉकने घेतले 50 बळी?

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पॅडॉक अमेरिकेतील नेवाडा प्रांतातील मेस्क्वाईट नावाच्या खेड्यात नऊ एप्रिल 2016 पासून राहात होता. त्या आधी नेवाडातील रेनो गावात 2011 ते 2016 पर्यंत तो राहिला. त्याचवेळी फ्लोरिडा प्रांतातील मेलबर्न येथेही 2013 ते 2015 या काळात तो राहायला होता, अशा नोंदी पोलिसांना मिळाल्या आहेत. 1990 पासून पॅडॉक सतत घर बदलत असे, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

अमेरिकेतील लास वेगासमधील गोळीबारप्रकरणात 64 वर्षे वयाच्या आजोबा असलेल्या स्टीफन पॅडॉक या व्यक्तीचा संबंध असल्याचे प्राथमिक माहितीवरून पुढे येत आहे. तशा बातम्या पोलिसांच्या हवाल्याने अमेरिकन आणि युरोपियन माध्यमांनी प्रसारित केल्या आहेत. 

आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पॅडॉक पोलीस चकमकीत मारला गेला आहे. त्याने केलेल्या गोळीबारात किमान 50 लोक ठार झाले आहेत. मंडाले बे हॉटेलमध्ये 32 व्या मजल्यावर पोलिसांना पॅडॉक सापडला होता.  हॉटेलमध्ये सुरू असलेल्या संगीत कार्यक्रमावेळी अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी मारून घेतली असावी, असाही संशय व्यक्त होत आहे. पॅडॉककडे दहा बंदुका सापडल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. 

पॅडॉक अमेरिकेतील नेवाडा प्रांतातील मेस्क्वाईट नावाच्या खेड्यात नऊ एप्रिल 2016 पासून राहात होता. त्या आधी नेवाडातील रेनो गावात 2011 ते 2016 पर्यंत तो राहिला. त्याचवेळी फ्लोरिडा प्रांतातील मेलबर्न येथेही 2013 ते 2015 या काळात तो राहायला होता, अशा नोंदी पोलिसांना मिळाल्या आहेत. 1990 पासून पॅडॉक सतत घर बदलत असे, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. 

लास वेगासमध्ये ज्या ठिकाणी पॅडॉकने कथित हत्याकांड घडविले, त्या ठिकाणापासून मेस्क्वाईट हे सतरा हजार लोकवस्तीचे गाव अवघ्या सव्वा तासाच्या अंतरावर आहे. 

दीर्घकाळ एकटा राहणाऱया पॅडॉकची अलिकडच्या काळातील साथीदार मेरील्यू डॅन्ली होती. ती ऑस्ट्रेलियन असल्याचे समजले आहे. जानेवारी 2017 पासून ती पॅडॉकसोबत राहात आहे. पोलीस तिच्या शोधात आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, पॅडॉकचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नव्हते. तो लष्करातही नव्हता. 

Web Title: Marathi news Las Vegas Shooting Stephen Paddock