'रॉयल कपल' होणार 2018 मध्ये विवाहबद्ध

Harry-Meghan
Harry-Meghan

लंडन : प्रिन्स हॅरी आपली मैत्रीण व अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे, असे क्लेरेन्स हाऊसने सोमवारी जाहीर केले. वेल्सच्या राजपुत्राचा विवाह अभिनेत्री मेघन मार्कल 2018 च्या वसंत ऋतुमध्ये होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

या 'रॉयल कपल'चा या महिन्यात साखरपुडा झाला. 33 वर्षीय हॅरीने आपली आजी व राणी एलिजाबेथ-2 आणि राजघराण्यातील इतर जवळच्या मंडळींना विवाहाबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी मेघनच्या पालकांचा आशीर्वाद घेतला. लग्नानंतर ही जोडी तेथे त्यांचे भाऊ विल्यम आणि त्यांची पत्नी केट त्यांच्या दोन मुलांबरोबर लंडनच्या केन्सिंग्टन पॅलेसमधील नॉटिंगहॅम कॉटेजवर राहतील. 

मार्कलचे पालक थॉमस मार्कल आणि डोरिया रॅगलँड यांनी म्हटले आहे की, ते या विवाहामुळे अत्यंत आनंदी आहेत आणि त्यांनी या जोडप्यासाठी सुखी जीवनाची इच्छा व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com