मायक्रोसॉफ्टची अमेरिकेबाहेर चार हजार कर्मचारी कपात 

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

न्यूयॉर्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात प्रामुख्याने कंपनीच्या अमेरिकेबाहेरील कार्यालयांमध्ये होणार आहे. 

न्यूयॉर्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात प्रामुख्याने कंपनीच्या अमेरिकेबाहेरील कार्यालयांमध्ये होणार आहे. 

मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे, की ग्राहक आणि भागीदारांना चांगली सेवा देण्यासाठी कंपनी रचनात्मक बदल करीत आहे. यासाठी कंपनीने काही पावले उचलली आहेत. यात काही पदे रद्द होणार असल्याने या पदावरील कर्मचाऱ्यांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे. व्यवसाय सुरळीत सुरू राहावा, अशी प्रत्येक कंपनीप्रमाणे आमची अपेक्षा आहे. यासाठी काही ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यात येत असून, काही ठिकाणची गुंतवणूक काढून घेण्यात येत आहे. याचप्रमाणे रोजगार कमी जास्त होत असतात. 

मायक्रोसॉफ्ट विक्री व विपणन विभागातील तीन ते चार हजार कर्मचारी कपात करून असून, ही कपात प्रामुख्याने अमेरिकेबाहेर असेल. गेल्याच आठवड्यात मायक्रोसॉफ्टने विक्री आणि विपणन विभागानची रचना बदलण्याचे सूतोवाच केले होते. कंपनीच्या या दोन विभागांत जगभरात 50 हजार कर्मचारी काम करीत आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये अमेरिकेत 71 हजार कर्मचारी कार्यरत आहेत, तर जगभरात एक लाख 21 हजार कर्मचारी सेवेत आहेत.

Web Title: marathi news marathi website Microsoft US Job Cut