दलाई लामांना भेटणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा : चीन

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

बीजिंग : कुठल्याही विदेशी नेत्याने किंवा देशाने तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना निमंत्रित करणे किंवा त्यांना भेटणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल, असा इशारा चीनकडून आज देण्यात आला. दलाई लामा हे फुटीरवादी नेते आहेत, असा आरोपही चीनकडून पुन्हा करण्यात आला. 

दलाई लामा यांना भेटणाऱ्या जागतिक नेत्यांचा चीनकडून सातत्याने निषेध केला जातो. तिबेट हा चीनचा भाग असून, बीजिंगच्या माध्यमातूनच जगाने तिबेटशी राजनैतिक संबंध ठेवायला हवेत, अशी सक्तीही चीनकडून करण्यात आलेली आहे.

चालू वर्षी अरुणाचल प्रदेशसह इशान्य भारतातील काही ठिकाणांना भेटी देण्यास दलाई लामा यांना भारताने परवानगी दिली होती, त्यालाही चीनने तीव्र विरोध केला होता. 

दलाई लामा यांना कुठल्याही देशाने किंवा संस्थेने निमंत्रित करणे किंवा भेटणे हा चीनच्या दृष्टिकोनातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो, असे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी झांग यिजिआँग यांनी स्पष्ट केले. धार्मिक नेते या नात्याने दलाई लामा यांना भेटण्याचा कुठल्याही देशाने केलेला दावा चीनला मान्य नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: marathi news marathi websites China Dalai Lama India