डोकलाममध्ये चीनचे सैनिक कायम राहणार 

पीटीआय
बुधवार, 10 जानेवारी 2018

बीजिंग : चीनने डोकलाममध्ये सैन्य कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट केले. भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी नुकतेच डोकलाममध्ये सैन्याची संख्या कमी होत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला आक्षेप घेत चीनने आपली भूमिका मांडली. डोकलामवरून कोणताही वाद नाही आणि चीनच्या सैनिकांची गस्त सुरूच राहील, असे चीनने नमूद केले. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी पाकिस्तानमध्ये सैनिकतळ तयार करण्याचे आणि अरुणाचल प्रदेशसंदर्भातही धोरण मांडले. चीनने म्हटले, की डोकलाम हा चीनचा भाग असल्याचा दावा आज करण्यात आला. त्यावर कोणताही वाद नसल्याचे चीनचे म्हणणे आहे.

चीनच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक या ठिकाणी गस्त घालतील आणि छावण्याही तयार करतील, असे लू कांग म्हणाले. अरुणाचल प्रदेशबाबत बोलताना ते म्हणाले, की पूर्व चीन आणि भारत सीमेवर मोठा वाद आहे. यासाठी आपल्याला परस्पर सहमतीनेच एखाद्या निष्कर्षावर पोचावे लागेल. तत्पूर्वी तेथे शांतता राखावी लागेल. सीमेसंबंधीच्या ऐतिहासिक करारानुसार प्रासंगिक वादाची सोडवणूक करू शकतो. पाकिस्तानातील सैनिकतळाबाबत ते म्हणाले, की याबाबत बाहेर काय बोलले जात आहे, हे ठाऊक नाही.

सीपीईसीची निर्मिती ही बेल्ट अँड रोड तयार करण्यात महत्त्वाचा भाग आहे. सीपीईसीच्या माध्यमातून दोन्ही देशांना आणि नागरिकांना फायदा होईल यासाठी चीन आणि पाकिस्तान प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अन्य देशांनी याबाबत अधिक डोक लावायची गरज नाही.

Web Title: marathi news marathi websites doklam standoff India China military