अमेरिकन डॉलरला चीन-पाकचे 'बाय बाय' 

representational image
representational image

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत व अमेरिकेची वाढती मैत्री पाहून चीन अमेरिकेनेही खेळी खेळण्यास सुरवात केली असून, याचाच एक भाग म्हणून चीन-पाकिस्तान आर्थिक पट्ट्यात (सीपेक) चीनचे चलन युआनचा वापर करणार असल्याची माहिती पाकिस्तानचे योजना व विकास मंत्री एहसान एक्‍बाल यांनी दिली.

आगामी काळात चीन व पाकिस्तानमध्ये युआनमध्ये व्यवहार होणार असून, अमेरिकन डॉलरचा वापर सीपेकमध्ये करण्यात येणार नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

इक्‍बाल यांनी 'सीपेक'साठी आखण्यात आलेल्या दीर्घकालीन योजनांचा आढावा घेतला. तसेच यासंबंधी चर्चा करण्यात येत असल्याचेही सांगितले. 

एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार चीनच्या मागणीला लागलीच होकार देऊन पाकिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरचा वापर करण्यात येत होता. चिनी चलन युआनला डॉलरचा दर्जा देण्यासाठी अजूनही तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या दीर्घकालीन योजनांच्या आधारे परस्पर साहाय्यावर भर देण्यात येणार आहे. दीर्घकालीन योजनांचा पहिला टप्पा 2020, दुसरा टप्पा 2025 व तिसरा टप्पा 2030 ला पूर्ण होणार आहे. 

'सीपेक' प्रकल्पांसाठी चीनकडून मिळणारा निधी रोखण्यात आला असल्याच्या वृत्ताचा इक्‍बाल यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. सीपेकचा प्रकल्प एकूण 46 अब्ज अमेरिकन डॉलरचा असून, यामध्ये आणखी खर्च अपेक्षित आहे. 

दोन्ही देशांची कराराला मान्यता 
पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र असणाऱ्या 'द डॉन'ने यासंदर्भात दिलेल्या वृत्तामध्ये 2017 ते 2030 साठी बनविण्यात आलेल्या योजनांच्या करारावर दोन्ही देशांकडून 21 नोव्हेंबरला हस्ताक्षर करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्या वेळी चीनचे राजदूत याओ जिंग व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

दोन देशांचा द्विपक्षीय व्यापारसंबंध चिनी चलन युआनमध्ये करण्यासंबंधी चीन आग्रही आहे. दोन्ही देशांमध्ये चलनाच्या वापरावर चर्चा सुरू आहे. युआनचा वापर पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीयहिताच्या विरोधात नसून, तो फायद्याचाच आहे. आगामी काळात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यात आर्थिक व्यवहारांचा वाटा मोठा असेल. 
- एहसान एक्‍बाल, पाकिस्तानचे योजना व विकासमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com