हाफिज सईदची पाककडून पाठराखण 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 डिसेंबर 2017

इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी आज जोरदार पाठराखण केली. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी सईद हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्पष्ट करत बाज्वा म्हणाले, की प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा त्याला हक्क आहे. 

पाकिस्तानी संसदेच्या एका समितीसमोर बाज्वा यांनी आज परराष्ट्र धोरण, दहशतवादाच्या विरोधातील लढाई अशा अनेक मुद्द्यांवर मते मांडली. या वेळी बाज्वा यांनी सईद संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील धक्कादायक विधाने केली. 

प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा सईदला हक्क आहे. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे बाज्वा म्हणाले. या वेळी बाज्वा यांनी सईदची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. 
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी आगामी निवडणुकीसाठी सईदच्या जमात उद दवा (जेयूडी) या संघटनेशी आघाडी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्या पार्श्वभूमीवर बाज्वा यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

जेयूडीचा प्रमुख असलेल्या सईदचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत संयुक्त राष्ट्रांनी केला आहे. 

सईदप्रकरणी अमेरिकेला चिंता 
वॉशिंग्टन : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने पाकिस्तानात होणारी 2018ची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. या घडामोडींबाबत आम्हाला चिंता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली. जमात उद दवा (जेयूडी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेला सईद हा पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्याबद्दलही अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादी कारवाया केल्याबद्दल सईदच्या डोक्‍यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. 

लष्करे तोयबाचाही संस्थापक असलेल्या सईदने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मिल्ली मुस्लिम लीग पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे सईदने म्हटले असले, तरी या पक्षाची अद्याप निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही. 

सईदची नोव्हेंबरमध्ये नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तो पाकिस्तानात मोकाट फिरत असून, त्याने निवडणूक लढविण्याची घोषणा करणे या घडामोडी चिंताजनक आहेत, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Pakistan Hafiz Saeed Mumbai Terror Attacks