युद्धसज्जता वाढविण्याचे जिनपिंग यांचे आदेश 

पीटीआय
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीची सुरवात करताना चीनच्या सैनिकांना सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आणि युद्धसज्जता वाढविण्याचे आदेश दिले. 

कम्युनिस्ट पक्षाच्या पाच वर्षांतून एकदा होणाऱ्या बैठकीमध्ये जिनपिंग यांना पक्ष, लष्कर आणि देश यांचे सर्वोच्चपद गेल्या आठवड्यात बहाल करण्यात आले. जिनपिंग यांच्या विचारसरणीलाही चीनच्या घटनेत स्थान देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

यानंतर जिनपिंग यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत त्यांना युद्ध जिंकण्यावर भर देऊन सज्जता वाढविण्याचे आदेश दिले. चिनी सैन्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या अध्यक्षपदावर असलेले जिनपिंग हे या समितीमधील एकमेव नागरी नेते आहेत.

जिनपिंग यांनी नव्या कार्यकालाच्या पहिल्याच दिवशी आपल्या सैन्याला अनेक आदेश दिले. चीनचे सैन्य हे चीन सरकारचा नव्हे, तर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा आदेश मानते, त्यामुळे सैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, असे आदेश जिनपिंग यांनी दिले. तसेच, युद्ध जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे, सुधारणा घडवून आणणे, युद्धभूमीवर तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नियमांचे काटेकोर पालन करणे, असे काही आदेश जिनपिंग यांनी दिले.

सैन्यातील भविष्यातील बदलांचा आढावा घेऊन त्यासाठी तयार राहण्याबरोबर सैनिकांमध्ये पक्षनिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

Web Title: marathi news marathi websites Xi Jinping China India relations