भारतावर अणू हल्ला करण्याची पाक परराष्ट्रमंत्र्यांची धमकी

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

''भारतीय लष्करप्रमुखांकडून करण्यात आलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. सध्या आम्ही कोणताही मुद्दा सौम्यरितीने घेत नाही. कोणत्याही चुकीच्या आधारावर कोणतीही अडचण व्हायला नको. तसेच पाकिस्तान स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वत:ला वाचवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे''. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी भारतावर अणू हल्ला करण्याची धमकी दिली. भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्तव्यानंतर ख्वाजा यांनी अणू हल्ल्याची भाषा करत प्रत्युत्तर दिले.

''भारताचे लष्करप्रमुख रावत यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले, जर भारताची अणू हल्ल्याची इच्छा असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करतो'', असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या 'न्युक्लिअर ब्ल्फ' आणि सीमा रेषा पार करण्यासाठी आम्ही तयार आहोत. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी टि्वट करून सांगितले, की ''भारतीय लष्करप्रमुखांकडून करण्यात आलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. सध्या आम्ही कोणताही मुद्दा सौम्यरितीने घेत नाही. कोणत्याही चुकीच्या आधारावर कोणतीही अडचण व्हायला नको. तसेच पाकिस्तान स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वत:ला वाचवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे''. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national news Pakistan foreign minister threatens India of nuclear attack