उत्तर कोरियाच्या सैनिकाची नाट्यमय चित्रफीत व्हायरल 

उत्तर कोरियाच्या सैनिकाची नाट्यमय चित्रफीत व्हायरल 

सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा गोळ्या लागल्या. तरीही तो सैनिक सीमा ओलांडून जाण्यास यशस्वी झाला. त्यानंतर त्याला दक्षिण कोरियन सैनिकांनी ताब्यात घेतले व त्याचे प्राण वाचवले. 

उत्तर कोरियाने सैनिकाचा पाठपुरावा करण्यासाठी शारिरीकदृष्ट्या सीमा ओलांडून व गोळीबार करून कोरियन युद्धविराम करारनाम्याचा भंग केला, असे यूएन प्रवक्ता कर्नल चॅड जी. कॅरोल यांनी पत्रकारांना सांगितले. उत्तर कोरियन सैनिकांनी पळ काढणाऱ्या सैनिकावर चाळीस फैरी झाडल्या. 

उत्तर क्षेत्रातील सैनिकांनी पळ काढणाऱ्या सैनिकावर  अंदाधुंद गोळीबार सुरु केला तेव्हा त्या सैनिकाने सीमेला लागून असलेली भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. भिंतीच्या जवळ झाडांच्या पानांच्या ढिगाऱ्यात तो सैनिक जखमी अवस्थेत पडला होता. उत्तर कोरियाचे सैनिक तेथे पोहोचण्याअगोदरच भिंती पलीकडील सैनिकांनी जखमी सैनिकास आपल्याकडे सुरक्षित ओढले.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com