पाकिस्तान हे जगातील निर्वासितांचे सर्वात मोठे आश्रयस्थान

वृत्तसंस्था
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पाकिस्तानने तीन दशकांपेक्षा अधिक काळ अफगाणिस्तानच्या निर्वासितांना आश्रय दिला.

इस्लामाबाद: पाकिस्तान हा जगातील निर्वासितांना आश्रय देणारा सर्वात मोठा देश असून, यात अफगाणिस्तानातील निर्वासित सर्वाधिक आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या उच्च आयोगाने जाहीर केले आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाप्रमाणे, पाकिस्तानात सर्वांत जास्त संख्येने निर्वासित आहेत. त्यातील 14 लाख 50 हजार निर्वासित हे अफगाणिस्तानातील आहेत. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानने निर्विवादपणे लाखो निर्वासितांची व्यवस्था केली आणि सर्वच देशातील, विशेषत: अफगाणिस्तानच्या नागरिकांना युद्धकाळात सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिली. त्यावेळीही 14 लाख 50 हजार निर्वासित पाकिस्तानात होते. 

पाकिस्तानने तीन दशकांपेक्षा अधिक काळ अफगाणिस्तानच्या निर्वासितांना आश्रय दिला. त्याचप्रमाणे पाकिस्तानातल्या, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मोठ्या प्रमाणात स्वदेशी पाठविण्यात आले. असे अहवालात म्हटले आहे. 

मार्च 2002 पासून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या उच्च आयोगाने पाकिस्तानातील सुमारे 41 लाख नोंदणीकृत अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानला परतण्यास मदत केली आहे.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news pakistan largest patron to refugees