स्वतःच्या मुलीला सोबत घेऊन अँकरने दिली बलात्काराची बातमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

इस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब भागात एका 7 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची निंदा करण्यास पाकिस्तानच्या एका टिव्ही अँकरने चक्क आपल्या लहान मुलीला स्टुडीयो मध्ये आणले. एवढेच नव्हे तर आपल्या मुलीला सोबत घेऊन या अँकरने संपूर्ण बातमीपत्र वाचले. 

या अँकरचे नाव किरण नाज आहे. या बातमीपत्रच्या सुरुवातीला किरण म्हणाली, 'आज मी किरण नाज नाही तर एक आई आहे.' या भावूक शब्दांसोबतच तिने देशातील न्याय व्यवस्थेवर परखड प्रश्नं देखील निर्माण केलेत. 

गेल्या गुरुवारी पाकिस्तानातील रोड कोट परिसरात घराजवळ ट्युशनला जाताना एका 7 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी याच मुलीचा मृतदेह पोलिसांना तपासादरम्यान कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला. पोलिसांनुसार 4-5 दिवसांपुर्वीच या मुलीची हत्या करण्यात आली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pakistan rape protest news anchor with her daughter