भारत 'शिटहोल देश' : लेखक सलमान रश्‍दींचे वादग्रस्त विधान 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

न्यूयॉर्क : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे लेखक सलमान रश्‍दी यांनी भारताचा उल्लेख 'शिटहोल' असा करत पुन्हा एकदा नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. 'एचबीओ' वाहिनीवरील एका चर्चेच्या कार्यक्रमात रश्‍दी यांनी असा उल्लेख केला. 

'रिअल टाईम विथ बिल माहेर' अशा शीर्षकाचा एक चर्चेचा कार्यक्रम 'एचबीओ'वरून प्रसारित होतो. विल्यम माहेर हे त्याचे सूत्रसंचालक आहेत. या कार्यक्रमामध्ये राजकारणातील विषयांवर विनोदी अंगाने भाष्य केले जाते. या कार्यक्रमातील ताज्या भागामध्ये सलमान रश्‍दी, विन्सेट फॉक्‍स, ऍना डिव्हेअर स्मिथ, फ्रॅन लेबोवित्झ सहभागी झाले होते. 

या कार्यक्रमामध्ये एका क्षणी सूत्रसंचालकाने 'अमेरिकेत नेमक्‍या समस्या काय आहेत, असं वाटतं' असा प्रश्‍न विचारला. त्यावरील चर्चेतून विषय अमेरिकेतील बंदूक लॉबीकडे वळाला. फ्लोरिडातील गोळीबाराच्या पार्श्‍वभूमीवर ही चर्चा सुरू झाली. 'आपल्या मुलांना अशा प्रकारच्या हिंसाचारापासून संरक्षण मिळायला हवे' असे मत रश्‍दी यांनी या विषयावरील चर्चेत मांडले. 

त्यानंतर 'अमेरिकेमध्ये बंदूक मिळविणे किती सहज शक्‍य आहे' या मुद्यावर चर्चा सुरू झाली. फ्रॅन लेबोवित्झ यांनी 'एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला बंदूक मुळातच कशासाठी हवी' अशी भूमिका मांडली. त्यावर रश्‍दी यांनीही मत मांडले. 'माझ्या माहितीनुसार, 'भारतासारख्या 'शिटहोल' देशासह' जगातील बहुतांश देशांमध्ये बंदूक मिळविणे इतके सोपे नसते', असा उल्लेख रश्‍दी यांनी केला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Salman Rushdie Shithole country India