राजे भूमिबोल यांच्या अंत्यविधींसाठी 5 लाख लोक; 9 कोटी डॉलर खर्च

राजे भूमिबोल यांचा अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने केला जाणार आहे.
राजे भूमिबोल यांचा अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने केला जाणार आहे.

बॅंकॉक : थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल अदुल्यदेज यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर गुरुवारपासून त्यांच्यावरील अंत्यसंस्कार विधींना बॅंकॉकमध्ये सुरवात झाली. पारंपरिक पद्धतीने होणारा हा विधी पाहण्यासाठी आणि आपल्या आवडत्या राजाला अंतिम निरोप देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच पाच लाखाहून अधिक नागरिकांनी राजवाड्याबाहेर गर्दी केली होती.

नववे राम म्हणून थायलंडवर राज्य करणारे राजे अदुल्यदेज यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर एक वर्षाचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात त्यांचे पुत्र वाजिरालोंगकोर्न यांनी दहावे राम म्हणून सत्ता हातात घेतली. दुखवटा संपल्यानंतर आजपासून पाच दिवसांच्या अंत्यसंस्कार विधींना येथे सुरवात झाली. तब्बल 70 वर्षे, म्हणजेच जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले राज्यकर्ते म्हणून परिचित असलेले भूमिबोल यांचा थायलंडमध्ये एकता आणि शांतता टिकवून ठेवण्यात मोठा वाटा होता. त्यामुळेच त्यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड प्रेम होते. म्हणूनच या आवडत्या राजाला अंतिम निरोप देण्यासाठी काळे कपडे परिधान केलेल्या जवळपास पाच लाख नागरिकांनी आज अंत्ययात्रेच्या मार्गावर गर्दी केली होती. या अंत्यविधीला राजघराण्यातील सर्व जण उपस्थित होते.

राजे भूमिबोल यांचा अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने केला जाणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी नऊ कोटी डॉलरचा निधी थायलंड सरकारने राखून ठेवला आहे. पूर्वी कधीही झाला नाही एवढा भव्य कार्यक्रम या वेळी केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com