रशियात पुन्हा सहा वर्षांसाठी पुतीनपर्व! 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

मॉस्को : जवळपास 20 वर्षे रशियात सत्तेवर असलेल्या व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकत देशाच्या राजकारणावरील आपली पकड आणखी घट्ट केली आहे. अधिकृतरित्या जाहीर झालेल्या निकालांनुसार, पुतीन यांना 76 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत. 

या विजयामुळे पुतीन आणखी सहा वर्षे अध्यक्षपदावर राहणार आहेत. 1999 पासून पुतीन यांनी रशियाचे पंतप्रधानपद आणि नंतर अध्यक्षपद सांभाळले आहे. यापूर्वी 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुतीन यांना 64 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत पॅव्हेल ग्रुडिनिन यांना 12 टक्के मते मिळाली. सेनिया सोबाचक आणि व्लादिमीर झिरिनोव्हस्की यांना अनुक्रमे दोन टक्के आणि सहा टक्के मते मिळाली. पुतीन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अलेक्‍सी नवल्नी यांचा अर्ज कायदेशीर कारणाने बाद झाला होता. 

गेल्या वीस वर्षांमध्ये पुतीन यांनी आर्थिक आघाडीसह लष्कराचा विस्तार आणि परराष्ट्र धोरणांमध्येही ठसा उमटविला होता. देशांतर्गत राजकारणामध्येही त्यांनी पकड निर्माण केली आहे. 

पुतीन यांना पर्यायच नाही 
निवडणुकीपूर्वी एका सर्वेक्षणात बहुसंख्य नागरिकांनी पुतीन यांना पहिली पसंती दिली होती. 'सामर्थ्यशाली रशियाचा सामर्थ्यशाली अध्यक्ष' अशी पुतीन यांच्या प्रचाराची 'थीम' होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Vladimir Putin wins 6 more years in power