जगभरात आकारले जायचे 'हे' विचित्र कर

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सामान्य माणसाला फक्त टॅक्समध्ये किती कपात झाली यामध्ये रुची असते. पण इतिहासात अशा अनेक गोष्टींवर कर आकारला जात आसे ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सामान्य माणसाला फक्त टॅक्समध्ये किती कपात झाली यामध्ये रुची असते. पण इतिहासात अशा अनेक गोष्टींवर कर आकारला जात आसे ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. 

  • इग्लंडचा शासक हेनरी VIII, त्यांची मुलगी एलिजाबेथ I आणि रशियाच्या पीटर द ग्रेट यांनी दाढीवर कर लावला होता.
  • पीटर द ग्रेट याने 'सोल टॅक्स' म्हणजेच आत्म्यावर देखील कर आकारला होता. ज्या लोकांचा आपल्याजवळ आत्मा आहे यावर ठाम विश्वास आहे, अशा लोकांना हा कर वसूल करण्याचे काम देण्यात आले होते. ज्यांचा विश्वास नसेल त्यांच्यावर धार्मिक भावना नसल्याबद्दल कर आकारला जात असे.
  • 1695 मध्ये ज्युलिअस सिजरने इंग्लंडमध्ये आणि 1702 मध्ये पीटर द ग्रेटने बॅचलर टॅक्स सुरू केला होता. वयाची पन्नाशी गाठलेल्या अविवाहित पुरूषांना हा बॅचलर टॅक्स भरावा लागत असे. 
  • हेनरीने जे लोक इंल्डंड कडून लढाई करणार नाहीत अशा लोकांवर कर आकारला होता. 
  • रोमचा सम्राट वेस्पेशनने सार्वजनिक शौचालायासाठी कर लावला होता. त्याच्या मुलाने जेव्हा या कराविरोधात काही मुद्दे उपस्थित केले तेव्हा त्याने आपल्या मुलाच्या नाकावर 'money doesn't stink' अर्थात 'पैशाला दुर्गंध येत नाही' अशा आशयाचा शिक्का मारला. 
  • जर्मनीमध्ये वैश्याव्यवसायाला कायद्याने परवानगी आहे. परंतु, 2004 पासून लागू झालेल्या करामुळे वैश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीडशे युरोपर्यंत कर भरावा लागतो. 
  • टर्कीतील ऑरकेंससमध्ये जर तुम्ही शरीरावर टॅटू काढला तर तुम्हाला 6 टक्के 'टॅटू टॅक्स' भरावा लागतो. 
  • 1 एप्रिल 2012मध्ये दिल्लीत गर्दीच्या ठिकाणी आणि गर्दीच्या वेळेला आपले खासगी वाहन घेउन जायचे असल्यास कर आकारला जाणार होणार होता. परंतु, या प्रकारच्या निर्णयावर एकमत झाले नाही त्यामुळे हा कर आकारला गेला नाही.
Web Title: marathi news weird bizarre taxes world