फेसबुकचे CEO झुकेरबर्ग यांना हटविण्याची मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

न्यूयॉर्क- फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकेरबर्ग यांच्या जागी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र अध्यक्षाची निवड करावी अशी मागणी फेसबुकच्या शेअरधारकांनी व्यक्त केली आहे. 

याबाबतचा एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्वतंत्र अध्यक्ष नेमल्यास हा फेसबुकच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकेल, कॉर्पोरेट कारभार सुधारू शकेल आणि शेअरधारकांच्या हिताचा व अधिक पारदर्शक कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे तो आखू शकेल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. 

कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी CEO मार्क झुकेरबर्ग आणि कंपनीचे संचालक मंडळ यांच्यामध्ये अधिकारांचा समतोल साधणे आवश्यक आहे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. 
 
Web Title: Mark Zuckerberg, 'Unliked' by Facebook Shareholders, Might be Forced to Leave