शिक्षिकेने विद्यार्थ्याला घेतले फक्त 'या'साठी दत्तक अन्...

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

विवाहित शिक्षिकेने 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला दत्तक घेतले. पण, दत्तक घेतल्यानंतर तुला सर्व काही शिकवते म्हणून त्याच्यासोबत दररोज शारिरीक संबंध ठेवत होती. अल्पवयीन मुलासोबत शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वॉशिंगटन : विवाहित शिक्षिकेने 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला दत्तक घेतले. पण, दत्तक घेतल्यानंतर तुला सर्व काही शिकवते म्हणून त्याच्यासोबत दररोज शारिरीक संबंध ठेवत होती. अल्पवयीन मुलासोबत शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायना कुल्वर (वय 45) असे शिक्षिकेचे नाव असून शाळेनेही शिक्षिकेला निलंबित केले आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीच्या ट्रेन्टनमध्ये ही घटना घडली आहे. 15 वर्षांच्या मुलाला त्याच्या घरामधून बाहेर काढण्यात आले होते. यावेळी रायना कल्वरने या कायदेशीररित्या त्याचे पालकत्व स्वीकारले आणि घरी आणले. घरी आणल्यानंतर त्याला शिकवण्याच्या नावाखाली त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले.

पीडित मुलाने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'शिकवण्याच्या नावाखाली शिक्षिकेने मला नको तिथे स्पर्श करण्यास सुरवात केली. माझ्याशी शारिरीक संबंध सुरू केले. पुढे तर दररोज शारिरीक संबंध ठेवत होती. मासिक पाळीच्यावेळीही शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. तिने माझ्यावर शारिरीक अत्याचार केला आहे. घरामध्ये ती नग्न होऊन शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. पण, या छळाला कंटाळल्यानंतर नकार दिल्यानंतर तिने मारहाण करून घराबाहेर काढले.'

 Rayna Culver is accused of having sex with the underage boy over a period of months

दरम्यान, या प्रकरणात अद्याप खटला चालू आहे. अटकेनंतर शिक्षिका रजेवर गेली आहे. मुलाचे भविष्य खराब करण्यासाठी आणि लैंगिक शोषणासाठी शिक्षिकेवर कारवाई केली जात आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, मुलाचा ताबा घेण्यापूर्वी शिक्षिकेने तरुणाशी जवळीक साधली होती. सुरुवातीला, शिक्षिका त्याला चुकीने स्पर्श करायची, परंतु त्याबद्दल मुलाने फारसा विचार केला नाही. नंतर, जेव्हा मुलाने शिक्षिकेशी संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा तिने त्याच्यावर दबाव आणला. शारीरिक संबंध ठेवण्यासाठीच शिक्षिकेने मुलाला दत्तक घेतले हे तपासात पुढे आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married teacher adopted 15 year old schoolboy pupil so she could have sex with him every day