VIDEO - हॉलिवूड गायिकेचं मंत्रमुग्ध करणारं भजन गायन; दिल्या दिवाळीच्या स्पेशल शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

या व्हिडीओत दिसून येतंय की, मिलबेन यांनी केसरी घागरा घातला आहे. कपाळावर टिकली लावली आहे तसेच भारतीय पद्धतीचे दागिनेही घातले आहेत.

वॉशिंग्टन : भारतीय संस्कृतीविषयी एक आदराची आणि आपुलकीची भावना संपूर्ण जगात आहे. भारतात असणाऱ्या विविधतेविषयी लोक आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. इथल्या संस्कृतीतील अनेक बाबी लोकांना भूरळ पाडताना दिसतात. आता अशीच एक भूरळ पाडणारी गोष्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - भारत-चीन तणावाची चिंता; रशिया धावणार मित्राच्या मदतीला

सध्या इंटरनेटवर हिंदू भजनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण यात विशेष आहे. ते असं की एका अफ्रिकन-अमेरिकन असणाऱ्या हॉलिवूडच्या अभिनेत्री आणि गायिकेने हे भजन म्हटलंय. मॅरी मिलबेन असं या गायिकेचं नाव आहे. तिने ओम जय जगदिश हरे हे प्रसिद्ध भजन म्हटलं आहे. 

हे भजन गुरुवारी मिलबेन यांच्याकडून युट्यूबवर पोस्ट करण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी दिवाळीनिमित्त सदिच्छाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी म्हटलंय की, ओम जय जगदिश हरे हे सुप्रसिद्ध हिंदी भजन दिवाळीच्या दरम्यान अनेक भारतीय घरांमध्ये म्हटलं जातं. हे भजन भक्तीसाठी म्हटलं जातं. या भजनाने माझ्या आत्म्याला स्पर्श केला. भारतीय संस्कृतीविषयी माझी आवड या भजनामुळे वाढली. असं त्यांनी म्हटलंय. 

या व्हिडीओत दिसून येतंय की, मिलबेन यांनी केसरी घागरा घातला आहे. कपाळावर टिकली लावली आहे तसेच भारतीय पद्धतीचे दागिनेही घातले आहेत. या गाण्याच्या शुटींगवेळचा व्हिडीओदेखील त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय की हिंदी भाषेच्या अभ्यासामुळे माझे भारताविषयीचे प्रेम आणि आवड आणखीनच वाढत आहे.

हेही वाचा - निवडणुकीत मतांची चोरी वा घोटाळा नाही; US निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

हॉलिवूडमधील एक अभिनेत्री आणि गायिका म्हणून मी माझ्या हिंदी अभ्यासाद्वारे भारतावर मनापासून प्रेम केले आहे. मी संस्कृती, संगीत आणि सिनेमा या विषयांत बुडून गेले आहे. आणि त्यामुळे माझे प्रिय हिंदी प्रशिक्षक डॉ. मोक्सराज यांची मी खूप खूप आभारी आहे. याआधी त्यांनी भारताचे राष्ट्रगीत म्हणतानाचा एक व्हिडीओ 74 व्या स्वातंत्र्यदिनी शेअर केला होता. यालाही अनेक नेटकऱ्यांनी उचलून धरत कौतुक केलं होतं. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mary Millben US singer performs Om Jai Jagdish Hare for Diwali video goes viral