शरीफ यांची मुलगी दोन मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

पाकीस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या कन्या मर्यम नवाज शरीफ या पाकीस्तानमध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्या लोहोर आणि पंजाब अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवतील. 

इस्लामाबाद (पाकीस्तान)- पाकीस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या कन्या मर्यम नवाज शरीफ या पाकीस्तानमध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्या लोहोर आणि पंजाब अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवतील. 

पाकीस्तानच्या संसदीय बोर्डानेही मर्यम यांच्या उमेदवारीला मंजूरी दिली आहे. त्यांनी दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखले केले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत. 

दरम्यान, पाकीस्तान मुस्लिम लीग एनचे अध्यक्ष शेहबाज शरीफ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची माहिती मागवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maryam Nawaz to contest from two seats in Pak elections