मसूद अजहर दहशतवादीच : मुशर्रफ

Masood Azhar
Masood Azhar

लंडन - जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहर हा "दहशतवादी' असल्याचा खुलासा पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केला असून, मसूदचा पाकिस्तानमधील बॉंबस्फोटांमध्येही सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लंडन येथे एका कार्यक्रमात बोलताना मुशर्रफ यांनी पाकिस्तान सरकारचा दहशतवाद्यांना पाठिंबा असल्याचेच अप्रत्यक्षपणे मान्य केले. मात्र, मसूद हा दहशतवादी असल्याचे मान्य असल्यास त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात चीनने आडकाठी आणू नये, असे पाकिस्तान चीनला का सांगत नाही, अशी विचारणा मुशर्रफ यांना या वेळी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी "चीनचा आणि मसूदचा संबंध नाही,' असे सांगत या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचे टाळले. पाकिस्तानमधील नवाझ शरीफ यांचे सरकार आक्रमक नसल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. नवाझ शरीफ यांना मुशर्रफ यांच्याकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील सध्याच्या संवेदनशील राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मुशर्रफ यांचा हा नवा हल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मुशर्रफ म्हणाले -

  • - पाकिस्तानमध्ये लष्कराकडे सत्ता असताना देशाचा विकास झाला
  • - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या छावण्या असल्याची माहिती नाही
  • - पाकिस्तान हा सामर्थ्यशाली लष्कर असलेला अण्वस्त्रसज्ज देश आहे, पाकिस्तानवर वर्चस्व गाजविता येणार नाही
  • - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्यामधील हस्तांदोलन हे निव्वळ एक कृत्रिम पाऊल आहे, सर्वमान्य तोडग्यासाठी भरीव प्रयत्न करणे आवश्‍यक आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com