अरे बापरे... काय डेरिंग आहे ही, या महिलेने पोटावर मधमाशी ठेवून केलं मॅटर्निटी फोटोशूट 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

भीतीदायक असं हा फोटो जो पाहून तुम्ही म्हणाल कि  
काय आहे त्या फोटोमध्ये त्यासाठी तुम्ही वाचाच हि बातमी. 

टेक्सास : चक्क पोटावर ठेवल्या मधमाशा; वाचा महिलेनं का केलं असं मॅटर्निटी फोटोशूट
तब्बल १० हजार मधमाश्या या प्रेग्नंट महिलेच्या पोटावर आहेत.

एखादी स्त्री जेव्हा तिच्या आयुष्यात आई होते तेव्हा ते क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय असतात. प्रत्येक जण हा क्षण जपून ठेवण्यासाठी त्याच अविस्मरणीय क्षणांसाठी कोणी मॅटर्निटी फोटोशूट फोटोशूट करतात तर कोणी व्हिडिओ बनवतात. मागील काही  वर्षांपासून मॅटर्निटी फोटोशूटची (Maternity photoshoot) क्रेझ आहे. आपल्या बेबी बंपसह खूप महिला फोटोशूट करतात.  मात्र सध्या असाच  एका मॅटर्निटी फोटोशूटची  जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्याच कारणही तसच आहे कि, या महिलेनं आपल्या पोटावर मधमाशा ठेवून फोटोशूट केलं आहे.

बेथानी कारूलक-बेकर नामक टेक्सासमधील एका महिलेनं हे अनोखे फोटोशूट केलं आहे. ती स्वतः मधमाश्या पाळत आहे.  तिने पोझ दिलेल्या फोटोमध्ये जवळपास १० हजार मधमाश्या तिच्या पोटावर बसल्या आहेत. तिने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर ते व्हायरल होऊ लागले. म्हणून मग अनेकांनी बाळाला धोका पोहोचेल अशी चिंता व्यक्त केली. तर काहींनी या महिलेने डॉक्टरांचा सल्ला का घेतला नाही असं म्हाणून तिच्यावर टीकाही केली.

अनोख्या फोटोचे अनोखे कारण 
यातच  या महिलेनं आपल्या फेसबुकवर लांबलचक अशी  पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तिनं हे  फोटोशूट का केलं याचं नेमकं कारण दिलं आहे. 

बेथानी म्हणाली, "गेल्या मागच्या वर्षात मी गर्भपाताच्या वेदना सहन केल्यात. त्यामुळे मला खूप डिप्रेशन आले होते.  या वर्षी जेव्हा  मी पुन्हा गर्भवती राहिले, तेव्हा मला परत माझं बाळ दगावले का अशी  ही भीती वाटत होती . म्हणून हि भीती घालवण्यासाठी मी असं फोटोशूट केलं आहे.  भविष्यात माझ्या गर्भात असलेले बाळ हे एका  योद्धाची आठवण करून देईल , म्हणून मी हे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maternity photoshoot Viral Maternity Photoshoot of Texas Woman honeybees on stomach