Ukraine War : भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; कॉलेजमध्ये प्रवेश न घेताच देता येणार MBBS ची परीक्षा

युक्रेन - रशिया युद्धामुळे वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अपूर्ण सोडून परतावं लागलं.
Medical-Students
Medical-StudentsSakal

भारतात परतलेल्या युक्रेनच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आता युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एमबीबीएस भाग १ आणि २ उत्तीर्ण करण्याची शेवटची संधी दिली जाईल.

काही ठरलेल्या सरकारी महाविद्यालयात प्रॅक्टिकल परीक्षा ही भारतीय एमबीबीएस अभ्यासक्रमाप्रमाणे असेल. परीक्षेनंतर रोटरी इंटर्नशीप दोन वर्षांसाठी अनिवार्य आहे. असा पर्याय देण्याची ही एकमेव वेळ आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com