McDonald's कर्मचाऱ्याचा १२ शब्दांचा राजीनामा; रातोरात झाला प्रसिद्ध

त्याच्या हिमतीला नेटकऱ्यांनी दिली दाद
McDonald's कर्मचाऱ्याचा १२ शब्दांचा राजीनामा; रातोरात झाला प्रसिद्ध

तुम्ही कधी सर्व्हिस सेक्टरमध्ये (Service Sector) काम केलंय? किंवा या क्षेत्राशी निगडीत आहात का? असाल तर या क्षेत्रात काम करणाऱ्यां पुढे येणाऱ्या अडचणी तुम्हाला नक्कीच ठावूक असतील. या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी कायमच अतिरिक्त काम करताना दिसतात. या सगळ्याचा इथे संदर्भ देण्याचं एक खास कारण आहे. कारण, अमेरिकेतील (US) कर्मचाऱ्याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्याचा हा राजीनामा सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला गेला. केवळ १२ शब्दांमध्ये या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असून त्यावर लिहिलेल्या मजकूरामुळे तो फेमस झाला आहे. (mcdonalds-employee-quits-job-and-closes-restaurant-with-savage-note-goes-viral)

अमेरिकेतील McDonald's येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. कामाचे अतिरिक्त तास आणि काम करण्याची पद्धत (Working hours & conditions) या सगळ्याला कंटाळून त्याने पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे त्याने राजीनामा देण्याची एक भन्नाट पद्धत शोधून काढल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला अक्षरश: उचलून घेतलं आहे.

McDonald's कर्मचाऱ्याचा १२ शब्दांचा राजीनामा; रातोरात झाला प्रसिद्ध
फुकटात बर्गर न दिल्यामुळे पोलिसांनी घेतलं हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात

कर्मचाऱ्याने दिला १२ शब्दांचा राजीनामा

अमेरिकेतील (Louisville) येथे असलेल्या McDonald's मध्ये एक कर्मचारी काम करत होता. मात्र, कामाचा ताणामुळे वैतागलेल्या या कर्मचाऱ्याने आऊटलेटला टाळं ठोकत. नोकरी सोडत असल्याचं एक लेटर या आऊटलेटबाहेर चिटकवलं. विशेष म्हणजे यावर त्याने लिहिलेला मजकूर अत्यंत मजेशीर होता.

McDonald's कर्मचाऱ्याचा १२ शब्दांचा राजीनामा; रातोरात झाला प्रसिद्ध
वरमालाऐवजी वधू-वरांनी घातले मास्क; व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ

"हे आऊटलेट आजपासून बंद आहे. कारण, मी या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मला या कामाचा प्रचंड तिटकारा आहे", असं या कर्मचाऱ्याने त्या लेटरवर लिहिलं. मात्र, त्याचं हे लेटर चांगलंच व्हायरल झालं. या कर्मचाऱ्याने तणावाखाली येऊन हे लेटर लिहिलं असेल. मात्र, त्याच्या क्रिएटिव्हिटीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा

या कर्मचाऱ्याचं लेटर व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी त्याला नवीन नोकरीची ऑफरही दिली आहे. तर, काही जणांनी त्यांना ऑफिसमध्ये काम करताना आलेल्या अनुभवाचं कथनही केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com