पाकिस्तानात प्रसारमाध्यमे, न्यायसंस्था स्वतंत्र नाहीत - पाक पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

आगामी निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीगचा (नवाज) विजय झाल्यास भावी पंतप्रधान कोण असेल, याबाबतचा निर्णय पक्षाचे नेते नवाज शरीफ घेतील, असे स्पष्ट करतानाच शरीफ यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाकिस्तानी नागरीकांना अमान्य असल्याचा दावाही अब्बासी यांनी केला

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये प्रसारमाध्यमे आणि न्यायसंस्था स्वतंत्र नाहीत, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी आज केले.

पत्रकारांशी बोलत ते म्हणाले, ''सार्वत्रिक निवडणुकीची हमी देणे हे सशस्त्र दलाचे काम नसून, ही निवडणूक वेळेवर घेण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीने घेतला आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यात ही निवडणूक पार पडेल.'' न्यायाधीशपदी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करताना त्या व्यक्तीची पूर्वपार्श्वभूमी आणि काम तपासून पाहिले जाईल. न्यायाधीश म्हणून निवड झालेली व्यक्ती न्यायाधीश म्हणूनच निवृत्त होते. मागील काळात या पदावर निवड झालेल्या काही व्यक्ती त्यासाठी पात्र नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेही अब्बासी म्हणाले.

आगामी निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीगचा (नवाज) विजय झाल्यास भावी पंतप्रधान कोण असेल, याबाबतचा निर्णय पक्षाचे नेते नवाज शरीफ घेतील, असे स्पष्ट करतानाच शरीफ यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाकिस्तानी नागरीकांना अमान्य असल्याचा दावाही अब्बासी यांनी केला. ते माझ्यासाठी अद्यापी पंतप्रधान असल्याचे अब्बासी या वेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Media, judiciary not independent in Pakistan: PM Abbasi