शवविच्छेदन अहवाल सांगतो फ्लॉईडचा मृत्यु मनुष्यवधानेच 

George Floyd's death
George Floyd's death

मिनीयापोलिस - कृष्णवर्णीय तरुण जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू म्हणजे मनुष्यवधच होय. व्हिडिओत दिसते त्यानुसार पोलिसांनी जेरबंद करून मानेवर दाब दिल्यामुळे त्याची ह्रदयक्रिया बंद पडली, असा शवविच्छेदन अहवाल आला आहे. पोलिस अधिकारी डेरेक शॉवीन याने फ्लॉईडच्या मानेवर गुडघा रोवला होता, तर इतर दोघांनी त्याच्या पाठीवर आणि गुडघ्यांवर दाब दिला होता. 

सरकारी अहवालाचे मुद्दे 
- तीन अधिकाऱ्यांनी शरिराच्या महत्त्वाच्या भागावर दाब दिल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला 
- पाठीवरही ताण पडल्यामुळे श्वास घेणे अशक्य 
- फ्लॉईडला ह्रदयविकार, उच्च रक्तदाबाचा त्रास 
- फेंटॅनील या मादक द्रव्याची नशा 
- अलिकडेच मेथॅम्फेटामाईन या अंमली पदार्थाचे सेवन 

बातम्या वाचण्यासाठी येथे क्किल करा

फ्लॉईड कुटुंबियांचा आक्षेप 
- फ्लॉईड कुटुंबाच्या मागणीनुसार शवविच्छेदन अहवालाची स्वतंत्र छाननी 
- डॉ. मायकेल बॅडेन व डॉ. अलिसिया विल्सन यांच्याकडून हे काम 
- डॉ. बॅडेन यांच्या मते फ्लॉईडची प्रकृती चांगली 
- ह्रदयविकाराचा कोणताही पुरावा नाही 

जेव्हा एखादा आरोपी श्वास घेऊ शकत नाही असे जर म्हणतो, तेव्हा अनेक पोलिसांचा असा समज होतो की, तुम्ही बोलू शकता म्हणजे श्वास घेत आहात. दुर्दैवाने ते खरे नसते. 
- डॉ. मायकेल बॅडेन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com