अमेरिकेतल्या श्रीमंतांच्या यादीत दोन भारतीय

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क - फोर्ब्स नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे त्याच्यातर्फे 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अमेरिकी व्यावसायिकांची यादी जाहिर करण्यात आली आहे. या यादीत 2 भारतीय वंशांच्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग या यादीत  सर्वोच्च स्थानी असून, त्यांची संपत्ती 50 अब्ज डॉलर आहे. तर, बायोटेक व्यावसायिक विवेक रामास्वामी या यादीत 24व्या स्थानी, तर अपूर्व मेहता 31व्या स्थानी आहेत. 

रामास्वामी यांची संपत्ती 600 दशलक्ष डॉलर, तर मेहता यांची संपत्ती 360 दशलक्ष डॉलर आहे. 

Web Title: Meet the 2 Indians who cracked Forbes’ richest US entrepreneurs under 40 list