मेहुल चोक्सीला दणका; डोमिनिका हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

mehul choksi fraud in Nashik
mehul choksi fraud in Nashik
Summary

पीएनबी बँक घोटाला प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी याच्या अडचणी आता आणखी वाढत आहेत. डोमिनिका उच्च न्यायालयाने मेहुल चोक्सीला जामीन देण्यास नकार दिला आहे.

सेंट जोन्स - पीएनबी बँक घोटाला प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी याच्या अडचणी आता आणखी वाढत आहेत. डोमिनिका उच्च न्यायालयाने मेहुल चोक्सीला जामीन देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाने मेहुल चोक्सीला फ्लाइट रिस्कचे कारण सांगत जामीन फेटाळला. डोमिनिका हायकोर्टाने मेहुल चोक्सीच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी वकिलांनी कॅरिकॉम नागरिक म्हणून मेहुल चोक्सीला जामीन द्यावा. मेहुल चोक्सीवर करण्यात आलेले आरोप हे जामिनपात्र आहेत. त्याच्यावर काही हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. मेहुल चोक्सीची तब्येत ठीक नाही. अशा परिस्थितीत फ्लाइट रिस्क त्याने घेऊ नये. त्याला जामीनाची रक्कम घेऊन जामीन द्यायला हवा.

मेहुल चोक्सीच्या जामीनावर राज्याचे वकील लेनोक्स लॉरेन्स यांनी विरोध दर्शवला. लेनोक्स लॉरेन्स यांनी म्हटलं की, मेहुल चोक्सी हा फ्लाइट रिस्कवर आहे. इंटरपोलनं त्याला नोटीस जारी केली आहे. त्यामुळे जामीन देता येणार नाही. अद्याप त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याला हव्या त्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मेहुल चोक्सीचा जामिन फेटाळला आहे.

mehul choksi fraud in Nashik
'डीपफेक पॉर्नोग्राफी'ची येऊ शकते महासाथ; तज्ज्ञांनी दिला इशारा

डोमिनिकामध्ये अवैध पद्धतीने घुसखोरी केल्याचा आरोप मेहुल चोक्सीवर आहे. रोजो मॅजिस्ट्रेटने जामीन फेटाळल्यानंतर मेहुल चोक्सीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयानेसुद्धा मेहुल चोक्सीचा जामीन नाकारला आहे. भारतातून पळून गेल्यानंतर मेहुल चोक्सी अँटिग्वात रहात होता. गेल्या महिन्यात 23 मे रोजी तो बेपत्ता झाला. त्यानंतर डोमीनिकामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी एक पथक विमानाने डोमिनिकाला गेलं होतं. मात्र मेहुल चोक्सीशिवाय पथक मायदेशी परतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com