esakal | Video : महापौर घागरा, चोळी घालून फिरले शहरभर...
sakal

बोलून बातमी शोधा

Mexican Mayor Paraded Through Town In Woman Clothes

एका नेत्याने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते महिलांची कपडे घालून शहरभर फिरले.

Video : महापौर घागरा, चोळी घालून फिरले शहरभर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेक्सिको : निवडणूकीच्या तोंडावर राजकीय नेते मतदारांना मोठ-मोठी आश्वासने देतात. मात्र, एकदा निवडूण आले की त्या आश्वासनांचा विसर पडतो. मात्र, येथील एका नेत्याने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते महिलांची कपडे घालून शहरभर फिरले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] दक्ष‍िण मेक्‍स‍िकोमधील महापौर जेवियर जिमेनेज हे घागरा आणि चोळी घालून शहरभर फिरत असून, त्यांच्यासोबत दोन अधिकारी सुद्धा महिलांच्या कपड्यांमध्ये आहेत. जनतेला दिलेली अश्वासनं पूर्ण न केल्यामुळे महापौरांनी महिलांची कपडे परिधान करून शहरभर फिरत आहेत, अशी पोस्टर त्यांच्या पाठीमागे असणाऱया नागरिकांच्या हातात आहेत. महापौर जेवियर जिमेनेज यांनी शहरात पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन निवडणूकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. मात्र, त्यांच्याकडून हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. शिवाय, एक कोटी आठ लाख रूपये आपल्या समाजात वाटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.'

दरम्यान, मेक्सिकोमधील एका महापैर स्कर्ट घालून शहरभर फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

loading image
go to top