शाळेतील गोळीबारात दोन विद्यार्थी ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

मेक्‍सिको सिटी: न्यू मेक्‍सिकोमधील ऍझटेक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता.7) झालेल्या या घटनेत हल्लेखोर मारला गेल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्‍त्याने येथील एका वृत्तवाहिनीला दिली. हल्ला करणारा विद्यार्थी ऍझटेक शाळेत शिकत होता, असे पोलिसांनी सांगितले.

गोळीबाराच्या घटनेनंतर शाळा रिकामी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्कूलबसमधून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले. गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले होते; पण नंतर यात कोणीही जखमी झाले नसल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला. शाळेत 900 मुले होती. गोळीबारानंतर शालेय प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून इमारत रिकामी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mexico city news Two students killed in school firing