मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या वडिलांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांचे वडील विल्यम एच गेट्स यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

वॉशिंग्टन- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांचे वडील विल्यम एच गेट्स यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. विल्यम एच गेट्स एक वकील आणि फिलान्थ्रोपिस्ट होते. सोमवारी त्यांचे वॉशिंग्टनमधील राहत्या घरी निधन झाले. ते अल्झामयरने पीडित होते. गेट कुटुंबीयांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. 

बिल गेट्स यांनी यासंबंधी ट्विट केलंय. माझ्या वडिलांची बुद्धीमत्ता, औदार्य, नम्रपणा आणि सहानुभूतीचा जगभरातील लोकांवर प्रभाव होता, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.  विल्यम सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रयत्नशील होते. बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा हातभार होता. ही संस्था आता जागतिक आरोग्यासाठी काम करत आहे. अमेरिकेतील धनाढ्य लोकांवर राज्य आयकर लादण्याचा अपयशी प्रयत्नही त्यांनी केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Microsoft founder bill gates father died