अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प एकेकाळी होते...

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

माईक टायसन मनोरुग्ण

- सर्वात पॉवरफुल बॉक्सर

नवी दिल्ली : जगातील सर्वांत शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांच्या पदाचा कार्यकाळ यावर्षी संपत आहे. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक बॉक्सर माईक टायसनचे आर्थिक सल्लागार होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावरून विविध चर्चा सुरु आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक बॉक्सर माईक टायसनचे वैयक्तिक आर्थिक सल्लागार होते. याबाबतचे मेसेजही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रम्प आणि टायसन यांचा हा फोटो 30 वर्षांपूर्वी काढल्याचे दिसत आहे.

Trump Source : India Today

माईक टायसन मनोरुग्ण

बॉक्सर असलेला माईक टायसन हा कालांतराने मनोरुग्ण झाला. तो संपूर्ण खचला. याची चर्चा सुरु आहे.

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षांत भारतातील गरिबी हटणार

सर्वात पॉवरफुल बॉक्सर

जगातील सर्वात पॉवरफुल बॉक्सर खेळाडू म्हणून टायसनने ओळख निर्माण केली होती. मात्र, त्याची प्रकृती नंतर बिघडली.  

तीन बेल्ट जिंकले

माईक टायसन हा पहिला असा बॉक्सर होता, त्याने तीन मोठे बेल्ट मिळवले. वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिल (डब्ल्यूबीसी), वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशन (डब्ल्यूबीए) आणि इंटरनॅशनल बॉक्सिंग फेडरेशन (आयबीएफ) मिळाले. 

कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवार, फडणवीसांचा जबाब घेणार 

काही पैशांसाठी नेमणूक

माईक टायसन याने डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. त्यासाठी ट्रम्प यांना त्यामोबदल्यात काही पैसे देण्याचे ठरले होते. मात्र, त्यासाठी किती रुपये दिले गेले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mike Tyson hired Donald Trump as his Finance adviser